संगमनगर येथील जुगार अड्डयावर छापा


दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा- सोलापूर राज्य मार्गावर असणार्‍या संगमनगर येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा मारून 1 हजार 190 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा – सोलापूर राज्य मार्गावर खेड, ता. सातारा गावच्या हद्दीत संगमनगर येथील असणार्‍या कॅनॉलजवळील टपरीच्या आडोशाला परमेश्‍वर प्रल्हाद अडागळे, रा. प्रतापसिंह नगर, ता. सातारा याच्याकडून 1 हजार 190 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.


Back to top button
Don`t copy text!