मलवडी गावच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा


दैनिक स्थैर्य । दि. ११ नोव्हेंबर २०२२ । सातारा । मलवडी, ता. माण गावच्या हद्दीत पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून मलवडी गावच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा टाकून ३ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करत जुगाराच्या साहित्यासह मोबाइल, दुचाकी जप्त केल्या.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलवडी गावच्या हद्दीत शहीद चौक ते सत्रेवाडी जाणाऱ्या रस्त्यानजिक मोकळ्या जागेमध्ये सिद्धनाथ जालिंदर कदम रा. शिंदी खुर्द, ता.माण, बाळू जिजाबा चव्हाण, रा. बुध, ता. खटाव, रुपेश तानाजी चव्हाण रा. आंधळी, ता. माण, समाधान उर्फ सम्राट दिलीप खरात, रा. मलवडी, प्रवीण मोहन जाधव, सदाशिव हमंत जाधव, लखन पोपट जाधव, रा. शिंदी खुर्द, ता. माण, दत्तात्रय हणमंत जाधव, रा. नवलेवाडी, ता. माण, सुहास नारायण रणपिसे, रा. दहिवडी हे हे नऊ जण जुगार खेळताना आढळून आले त्यांच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करत जुगाराच्या साहित्यासह मोबाइल, दुचाकी जप्त केल्या.


Back to top button
Don`t copy text!