दैनिक स्थैर्य | दि. 12 ऑक्टोबर 2021 | फलटण | फलटण तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्षे आमसभा झाली नसून फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने आमसभेचे आयोजन करावे अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांचेकडे केलेली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य व नगरसेवक सचिन सूर्यवंशी – बेडके, फलटण तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, फलटण शहर अध्यक्ष पंकज पवार, फलटण तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अमिर शेख, सातारा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस शंकरराव लोखंडे, तालुका युवक अध्यक्ष अजिंक्य कदम, तालुका युवक उपाध्यक्ष नवनाथ लोखंडे, शहर युवक अध्यक्ष प्रितम जगदाळे, अल्पसंख्याक अध्यक्ष तज्जुद्दिन बागवान, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण, अनुसुचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ दैठणकर, अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्ष अभिजित जगताप, महिला तालुका अध्यक्ष
सुजाता गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये जनावरांमध्ये सध्या लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तरी याबाबत लवकरात लवकर लसीकरण केले जावे. यासोबतच फलटण तालुक्यातील रस्ते, पाणी पुरवठा, घरकूल योजना यांच्यासह विविध समस्यां निदर्शनास आणून दिल्या त्यावर गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.