रजेवर असणाऱ्या कैद्याने ठाकूरकीतील नातेवाईकाचे घर पेटवले; गुन्हेगार पुन्हा कारागृहात


स्थैर्य, फलटण : आरोपी अंकुश लाला चव्हाण याने दारू पिऊन घेऊन फिर्यादी यांना म्हणाला हनुमंत बोडरे याला बोलावून घेऊन ये असे म्हणाले फिर्यादी हे बोलावण्यास गेले नाहीत याचा राग मनात धरून त्याने फिर्यादी याचे राहते शेडवजा घर पेटवून दिले होते. गुन्हयातील आरोपी अंकुश लाला चव्हाण याला त्याच्या ताथवडे येथील गावातून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी गावांमध्ये दारू पिवून फिरत असल्याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, पो.काॅ. अच्युत जगताप यांनी त्याला तळ्याजवळ पकडले. विशेष अभिवचन रजेवर आल्यानंतर त्याने सदरचा गुन्हा केला आहे. गुन्हे त्याने दारूच्या नशेमध्ये केलेले आहेत. एका गुन्ह्यांमध्ये शिक्षा होऊन सुद्धा त्याच्या वर्तणुकीमध्ये काही सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले. तो गेले दोन वर्षांपासून कोल्हापुर मधील कळंबा कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिक्षाबंदी कैद्यांना विशेष रजेवर सोडण्यात आले होते. यामध्ये तो कारागृहातून बाहेर आला होता. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला कारागृहांमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!