
दैनिक स्थैर्य । 14 एप्रिल 2025। लोणंद । फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे पाडेगाव सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने महापुरुषांच्या जयंती निमित्त प्रसिद्ध युवा व्याख्याते राजवैभव एस. आर. यांचे संविधानाचा सांगावा हे परखड व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या अध्यक्षेतेखाली सदरील कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे, संयोजक गिरीश बनकर, सनी रायकर यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मिलिंद नेवसे म्हणाले की, राजवर्धन यांनी जे व्याख्यानातून मत व्यक्त केले आहे. ते अतिशय स्तुत्य असून आताच्या काळात संविधानाचे उदिष्ट हे सर्वसामान्य नागरिकांच्यासह सर्वच मंडळींनी अंमलात आणणे गरजेचे आहे.
पाडेगाव सामाजिक विकास प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून डीजे किंवा इतर बाबी करण्याच्या ऐवजी व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. व्याख्यानमालेचे सदरील चौथे वर्ष असून व्याख्यानमालेस उस्फुर्त प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.