खामकरवाडी येथील एकाची एटीएमद्वारे सुमारे ५२ हजारांची फसवणूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ जून २०२४ | फलटण |
मिनीस्टेटमेंट काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून खामकरवाडी (पिंपोडे खुर्द, ता. कोरेगाव) येथील एकाची त्याच्या एटीएमवरून ५१ हजार ८०० रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली असून या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी, दि.२०/०६/२०२४ रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास एसबीआय बँकेच्या लक्ष्मीनगर, फलटण येथील एटीएममध्ये फिर्यादी हणमंत खंडू सावंत (वय ६१ वर्षे, रा. खामकरवाडी, पिंपोडे खुर्द, ता. कोरेगाव, जि.सातारा) हे गेले होते. त्यावेळी त्यांनी एटीएममधून २००० रुपये काढले. त्यावेळी त्यांना मिनीस्टेटमेंन्ट काढता न आल्याने तेथेच त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने (वय अंदाजे ३० वर्षे) फिर्यादीस मिनीस्टेटमेंन्ट काढून देतो असे म्हणून फिर्यादीकडून त्यांचे एटीएम कार्ड पिन नंबर जाणून घेतला. त्यानंतर या इसमाने फिर्यादीस मिनीस्टेटमेंन्ट काढून दिले व तो फिर्यादीस त्यांचे कार्ड न देता दुसरेच एटीएम कार्ड दिले व फिर्यादीचे एटीएम कार्ड घेऊन निघून गेला. त्यानंतर फिर्यादीचे एटीएम कार्डमधून सातारा व कराड येथून एकूण ५१,८०० रुपये काढून फिर्यादीची फसवणूक केली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास एएसआय भोसले हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!