दैनिक स्थैर्य | दि. २८ मे २०२४ | फलटण |
इयत्ता १० वी परीक्षेत भाडळी बु. (ता. फलटण) गावची सुकन्या कु. हिंदवी मोहनराव डांगे हिने घवघवीत यश मिळविले आहे. तिचे अभिनंदन दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक श्री. शशिकांत सोनवलकर यांनी करून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.
जय भवानी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तिरकवाडी, ता. फलटण येथे यावर्षी इयत्ता १० वी मध्ये कु. हिंदवी शिक्षण घेत होती. यावेळी तिने ९२.६० टक्के इतके गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला.
शिक्षक वर्गाचे योग्य मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांची चिकाटी असल्याने असे विद्यार्थी भविष्यातही यश मिळवतील, अशी भावना श्री. सोनवलकर यांनी यावेळी व्यक्त केली.
या यशाबद्दल कु. हिंदवीचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. शशिकांत सोनवलकर यांच्यासमवेत श्री. सुभाष सोनवलकर, श्री. मोहनराव डांगे तसेच कुटुंबीय उपस्थित होते.