दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग आयोजित ‘मराठी राजभाषा गौरव’ दिनानिमित्त मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘सूत्रसंचालन एक कला’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेस प्रमुख व्याख्याता, साधनव्यक्ती म्हणून श्री. अनिरुद्ध सोपान मुळीक (उपशिक्षक, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल सीबीएसई, जाधववाडी, फलटण) यांनी सर्व विद्यार्थ्यांना बारकाव्यांनिशी मूलभूत स्वरूपाचे ज्ञान व माहिती देऊन सर्वोत्तम प्रभावी मार्गदर्शन केले. याबरोबरच पदवी व पदव्युत्तर (टी.वाय.बी.ए., एम.ए.) निरोप समारंभ व सदिच्छा समारंभ यावेळी प्रभावी पेपर लेखनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच पदवी व पदव्युत्तर ‘माजी विद्यार्थी मेळावा’ यानिमित्त महाविद्यालयातील अनुभव व महाविद्यालयीन जीवनातील कविता सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रभाकर पवार मराठी विभाग प्रमुख यांनी केले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी कोमल हिने केले, तर आभार प्रा. अशोक शिंदे यांनी मानले.
या कार्यशाळेस महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांसह विद्यार्थी उपस्थित होते.