स्थैर्य, दि.७: हाथरस येथे 19 वर्षांच्या दलित मुलीसोबत कथित गँगरेप आणि मृत्यूनंतर अर्ध्या रात्री तिच्यावर जबरदस्ती अंत्यसंस्कार करण्यात आल्याने देशभरात संतापाचे वातावरण आहे. याच काळात मुख्य आरोपी संदीप आणि तरुणीच्या भावामध्ये फोन कॉल्सविषयी मोठा खुलासा झाला आहे. दोघांमध्ये 13 अक्टोबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत 104 वेळा बातचित झाली. पूर्ण कॉल ड्यूरिएशन जवळपास 5 तासांचे आहे. तर दोन्हींचे घर 200 मीटरच्या अंतरावर आहे.
62 कॉल संदीपने तर 42 कॉल पीडितेच्या भावाकडून एकमेकांना करण्यात आले आहेत. कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर) दैनिक भास्करजवळ आहे. सीडीआर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या डिटेलची कोणतेही अधिकारी आणि तपास एजेंसीने पुष्टी केलेली नाही.
पीडितेच्या भावाचा फोन त्याची पत्नी वापरत होती. असा तपास पथकातील सूत्रांचा दावा आहे. याच फोनवरुन पीडित आणि संदीप यांच्या बातचित झाल्याचा दावा केला जात आहे. सीडीआरमध्ये दोघांमधील संभाषण रात्रीच्या वेळी सुमारे 60 कॉल असल्याचे आढळले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी करणार्या एसआयटीला गृह विभागाने आणखी 10 दिवसांचा कालावधी दिला आहे.
ओळख उघड केल्यास ट्विटर, वेबसाइट्सवर एफआईआर
चंदपा पोलिस ठाण्यात कार्यकर्त्या डॉ. नूतन ठाकूर यांनी पीडितेची ओळख उघड करण्याविषयी तक्रार दिली. या प्रकरणी ट्विटर आणि संबंधित वेबसाइटवर कलम 228ए आईपीसी, 72 आईटी अॅक्टनुसार केस दाखल करण्यात आली आहे. नूतन यांनी 29 सप्टेंबर रोजी तक्रार पाठवली होती. यामध्ये ट्विटरवर पीडितेचे नाव घेणे, तिच्या नावाने ट्विटरवर विविध हॅशटॅग चालवणे, पीडितेचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासंबंधीत कारवाई करण्याची मागणी केली होती.
पूर्ण प्रकरण काय?
हाथरस येथे 14 सप्टेंबरला 4 लोकांनी 19 वर्षांच्या दलित तरुणीसोबत कथिक स्वरुपात सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींनी तरुणीचे पाठीच्या मनक्याचे हाड मोडले होते आणि तिची जीभ कापली होती. दिल्लीमध्ये उपचारांदरम्यान 9 सप्टेंबरला पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र पोलिसांचा दावा आहे की, मुलीवर अत्याचार झालेले नाही. मंगळवारी सरकारकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातही बलात्कार झाला नसल्याचे म्हटले होते.
योगी सरकार या प्रकरणाचा तपास SIT च्या माध्यमातून करत आहे. CBI तपासाची सिफारिशही केली आहे. पीडितेचा मृतदेह घाईघाईत जाळणे आणि निष्काळजीपणाच्या आरोपांमध्ये हाथरसच्या एसपीसह 5 पोलिसांना सस्पेंड करण्यात आले आहे.