
दैनिक स्थैर्य | दि. २९ मे २०२३ | फलटण |
उपळवे (ता. फलटण) येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
उपळवे येथील राहत्या घरातून दि. २८ मे रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने आपल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित करत आहेत.