राष्ट्रानेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या निमित्त शिरवळ येथे मेळावा संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । सातारा ।  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त शिरवळ येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला नागरिकांनी उत्सफर्त असा प्रतिसाद दिला.

हा मेळावा वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी तहसिलदार दशरथ काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्यात तालुकास्तरीय विविध विभागांनी सहभाग घेतला होता. पंधरवड्याचे नियोजन करताना शासन आपले दारी, फेरफार अदालत आणि पुनर्वसन दिन या योजनांचे अभिसरण करणेत आले. तसेच PM Kisan योजनेअंतर्गत e kyc करणे आणि निवडणूक विभागाशी संबंधित 6 ब फॉर्म भरून घेणे या कामाना प्राधान्य देण्यात आले.  अशाच प्रकारचे कार्यक्रम वाई आणि महाबळेश्वर तालुक्यांमध्ये आयोजित करण्याचे नियोजन केले असल्याचेही प्रांताधिकारी श्री. जाधव यांनी मेळाव्याप्रसंगी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!