दैनिक स्थैर्य | दि. ०८ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
भाडळी खुर्द, तालुका फलटण गावच्या हद्दीत दि. ७ फेब्रुवारी रोजी महादेव मंदिराच्या पाठीमागे सचिन दत्तात्रय पिसाळ (वय ३६, रा. भाडळी खुर्द, ता. फलटण) यांना चौघांनी लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणार्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात मिळालेली माहिती अशी, भाडळी खुर्द, तालुका फलटण गावच्या हद्दीत दि. ७ फेब्रुवारी रोजी महादेव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या गम्मू माने यांच्या गाळ्यासमोर सचिन दत्तात्रय पिसाळ हे उभे असताना देविदास फिर्यादीस बघून जवळ आले व फिर्यादीस म्हणाले की, तुला लय मस्ती आली काय, असे म्हणाले व यावेळी धीरज विष्णू सोनलकर याने त्याच्या हातातील लाकडी काठीने फिर्यादी सचिन पिसाळ यांच्या डोके तसेच पाठीवर मारले. तसेच बाजूला उभे असलेले नमूद तीन आरोपी यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.
या मारहाण प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी धीरज विष्णू सोनवलकर, हनुमंत दत्तात्रय सोनवलकर, दादा दत्तात्रय सोनवलकर, रामचंद्र शंकर सोनवलकर (सर्व राहणार भाडळी खुर्द, तालुका फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राऊत करत आहेत.