बोरीव येथील रिसॉर्टमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


स्थैर्य, वाई, दि.१५: वाई तालुक्यातील धोम धरणाच्या जवळ बोरीव गावच्या हद्दीत असलेल्या रिसॉर्टमध्ये फिरण्यास आलेल्या पर्यटक जोडप्याच्या रूममध्ये शिरून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाशीम येथील एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम गोविंदा राठोड(रा.साखरडो, जि. वाशीम) असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे.

पीडित २७ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ती व तिचा पती अन्य राज्यातून वाई येथे फिरण्यासाठी आले होते. दि.१३ रोजी ते बोरीव येथील मगन्स रिसॉर्टमध्ये राहिले होते.रूम नंबर एक मध्ये दोघे पती पत्नी झोपले असताना रात्री अकरा वाजता त्या महिलेला अन्य कोणीतरी छेडछाड करत असल्याचे जाणवले त्यावेळी एका बाजूला पती तर दुसऱ्या बाजूला कोणीतरी असल्याचे दिसताच तिने तिच्या पतीला उठवताच तो पळून जाऊ लागला.तिच्या पतीने विक्रम राठोड यास पकडले.त्या महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.हवालदार पवार तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!