भिंत पाडण्याचे काम करत असताना भिंत अंगावर एका मजुराचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.८: भिंत पाडण्याचे काम करत असताना भिंत अंगावर पडून गंभीर जखमी होऊन एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथील औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या काळोशी, (ता. सातारा) येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार दि. ७ रोजी दुपारी बारा वाजता औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या काळोशी, (ता. सातारा) गावामध्ये वीरपक्ष मुदकप्पा पुजारी (वय ४५, रा. कारंडवाडी, ता. सातारा. मूळ रा. कर्नाटक) हा मजूर भिंत फोडण्याचे काम करत होता. भिंत फोडत असताना अचानक भिंत अंगावर पडून पुजारी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी सिरीयलमध्ये धाव घेऊन या घटनेची माहिती घेतली त्यानंतर हा प्रकार सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडला असल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा या प्रकरणाचा तपास सातारा पोलिसांकडे सोपविण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!