
दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण महसूल आणि पोलिस विभागाने मध्यरात्री जिंती, तालुका फलटण येथे केलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी केलेल्या कारवाईत १ जेसीबी वाहन जप्त केले आहे. हे वाहन सध्या पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.