
स्थैर्य, 27 मार्च, सातारा : जागतिक महिला दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने कावडी ता. जावली येथे रविवार दि. 29 मार्च रोजी दुपारी 4 वाजता भव्य महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी दिली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, कावडी ग्रामपंचायत विकासाचा उत्सव आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वतीने व हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा कावडी येथे होणार आहे.
या सोहळ्याला ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, माजी आ. सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, भाजप जावली तालुकाध्यक्ष संदीप परामने, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यक्रारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, वन अधिकारी अमोल सातपुते यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी, जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, उप सभापती गोरख महाडिक, सर्व सदस्य, जावली तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याला अभिनेत्री संजना काळे व अभिनेते संदीप पाठक हेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व सभापती, उपसभापती व सदस्य यांचाही जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी, या भव्यदिव्य सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वसंतराव मानकुमरे यांनी केले आहे.

