अयोध्येतून फलटण येथे आलेल्या मंगल कलश अक्षतांची भव्य मिरवणूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 16 डिसेंबर 2023 | फलटण | श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या, विश्व हिंदू परिषद जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे अयोध्येतून फलटण येथे आलेल्या मंगल कलश अक्षतांची भव्य मिरवणूक उद्या रविवार, दि. १७ रोजी सकाळी ठीक ९ वाजून ३० मिनिटांनी फलटण येथील प्रभू श्रीराम मंदिर येथून काढण्यात येणार आहे.

अयोध्येतून फलटण येथे आलेल्या मंगल कलश अक्षतांची भव्य मिरवणूक हि श्रीराम मंदिर, नरसिंह चौक, उघडा मारुती मंदिर, रविवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, क्रांतिवीर राजे उमाजी नाईक चौक, गजानन चौक, क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर चौक, श्री गणपती मंदिर स्वामी विवेकानंद नगर येथे मिरवणुकीचा समारोप होईल.

सदरहू मिरवणुकीचे आयोजन फलटण तालुका संयोजक श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या द्वारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल फलटण तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

अयोध्येतून फलटण येथे आलेल्या मंगल कलश अक्षतांची भव्य मिरवणूकीसाठी सकल हिंदू समाज कृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, फलटण, हिंदू जन जागृती, इस्कॉन सेंटर, फलटण, श्री नवनाथ महाराज उत्सव समिती, विंचुरणी, फलटण, श्री स्वामी समर्थ मंदिर फलटण, श्री हनुमान मंदिर आरती केंद्र, फलटण तालुका, श्री गणेश मंदिर आरती केंद्र फलटण तालुका, श्री गुरुदेव दत्त,आरती केंद्र, फलटण तालुका, समस्त वारकरी संप्रदाय, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, फलटण तालुक्यातील समस्त मंदिर समिती, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र फलटण, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नामसाधना आरती मंडळ फलटण, आर्ट ऑफ लिविंग फलटण, धर्म जागरण फलटण, सनातन संस्था फलटण, श्री गजानन महाराज आरती मंडळ फलटण, अखिल भारतीय महानुभाव परिषद व श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट, फलटण, समस्त गणपती मंडळे, समस्त देवी उत्सव समिती यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!