श्रीमंत रामराजेंच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यती’चे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ एप्रिल २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटण फेस्टीव्हलद्वारे भव्य ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी फायनल व कॉटर फाईनल स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धांचा राज्यातील तमाम बैलगाडा शर्यत शौकिनांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अमितराव अशोकराव भोईटे व कै. नंदकुमार भोईटे मित्र मंडळ यांच्याकडून करण्यात आले आहे.

या बैलगाडा शर्यती शनिवार, दि. ६ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होणार असून या शर्यती साई मंदिरासमोर, जाधववाडी रोड, ता. फलटण, जि. सातारा येथे होणार आहेत. या स्पर्धांसाठी प्रवेश फी २५००/- रुपये राहील.

या स्पर्धांसाठी सुनील मोरे (पेडगाव), प्रताप तात्या झांजुर्णे, विकास सर (कोरेगाव कुमठे) हे निवेदक आहेत. झेंडा पंच म्हणून बाप्पू धनवडे (कोरेगाव) काम पाहणार आहेत.

या शर्यतीमध्ये फायनल बक्षिसे (सेमी फायनलमध्ये प्रथम येणार्‍या गाडीचे फायनल) अशी : प्रथम क्रमांक – २,७७,०००/-, द्वितीय – २,२५,०००/-, तृतीय – १,७७,०००/-, चतुर्थ – १,२५,०००/-, पाचवा – १,००,०००/-, सहावा – ७७,०००/- आणि सातवा – ५७,०००/- रुपये. तसेच सर्व फायनल गाडीस आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

कॉटर फायनल (सेमीमध्ये द्वितीय येणार्‍यांसाठी फायनल) बक्षिसे : प्रथम क्रमांक – ७७,०००/-, द्वितीय – ५५,०००/-, तृतीय – ३३,०००/-, चतुर्थ – २२,०००/-, पाचवा – १५,०००/-, सहावा – १०,०००/- आणि सातवा – ७,७००/- रुपये.

या शर्यती शासनाच्या नियम व अटी पाळून भरविल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी स्वत:च्या जबाबदारीने स्पर्धा पाहाव्यात. गट-सेमी-फायनल हे तिन्ही फेरे चिट्ठी टाकून होतील.

स्पर्धांसाठी संपर्क : अमोल भोईटे (७०२०६६८६१६), दत्तात्रय गुंजवटे (९९२२७३१५५५), अमित भोईटे (९५५२१७७१७७), जयकुमार इंगळे (९८५०२४५८७७), सुमित भाडळे (८६०५४४११०४), बिपीन मोहिते (९९७५६०२२२४), वैभव कदम (९९६०८६३२३१), नितीन जगताप (९८६०६३५७५४), सचिन गुंजवटे (९६८९८११५५५), कमलेश गुंजवटे (९७६७२९२६१४), राजाभाऊ शिरतोडे (८०८००२५११४), अभिजित (भैय्या) पवार (९८९०८४३३९३).


Back to top button
Don`t copy text!