दैनिक स्थैर्य । दि. १९ नोव्हेंबर २०२२ । सातारा । वाई, ता. वाई येथे दुचाकी जाणून चार चाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या चार जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात वाई पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. विजय मच्छिंद्र धोत्रे, वय २१, समीर पठाण, वय १९ दोघेही रा. सिद्धनाथवाडी, ता. वाई अशी दोघांची नावे असून दोन अल्पवयीन मुलांचा त्यामध्ये समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अशी, दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री १२.४५ ते २.१५ वाजण्याच्या सुमारास वाई येथील गंगापुरी, रविवार पेठ, घोरपडे हॉस्पिटल, रामडोह आळी परिसरात अज्ञात इसमांनी रस्त्यावर लावलेल्या बारा चार चाकी गाड्यांच्या पाठीमागील काचा फोडून गाड्यांचे नुकसान केले होते. गंगापुरी येथे एक दुचाकी जाळली होती. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे – खराडे यांनी व्हायचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना संबंधित अज्ञात इसमांना अटक करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने वाई पोलीस ठाण्याचे कर्मचारी व पुणे प्रकटीकरण शाखेचे पथक वाई येथील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करत होते. दरम्यानच्या काळात दि. १८ रोजी बाळासाहेब भरणे यांना या पुण्यातील एकाची माहिती मिळाली. त्याचा खाऊ ठिकाणा प्राप्त करून त्याला ताब्यात घेतले असता या गुन्ह्यात आणखीन तीन जण सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना पाचवड आणि सातारा येथून ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन अल्पवयीन बालकांचा समावेश आहे. त्यांनी हा प्रकार पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून केल्याचे सांगितले.
या कारवाईत पोलीस अंमलदार विजय शिर्के, सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे सहभागी झाले.