गणेशवाडी (औंध)नजीक चारचाकी गाडी गोठयास जाऊन धडकली; गोठयाचे नुकसान


स्थैर्य, औंध, दि. १६ : कळंबी ते औंध रोडवरील गणेशवाडी नजीक कळंबी रस्त्याच्या दिशेकडून औंधकडे निघालेली चार चाकी कार गणेशवाडी नजीकच्या उतारावरून खाली येत असताना स्लिप होऊन गावातील एका घराजवळील गोठयाला धडकली. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. यामध्ये गोठयाचे नुकसान झाले असून सुदैवाने यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने तसेच जनावरे शेतात सोडल्याने कोणत्याही प्रकारची मोठी दुर्घटना याठिकाणी घडली नाही.दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने यावेळी ग्रामस्थ गोळा झाले होते.

औंध ते कळंबी मार्गे कराड हा अतिशय रहदारीचा मार्ग बनला आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून यावेळी ग्रामस्थांनी यामार्गावर स्पीडब्रेकर बसविण्याची मागणी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!