लग्नात नियमापेक्षा जास्त वर्‍हाडी जमली मंगल कार्यालयास 25 हजार तर लग्नमालकास 10 हजार दंड


स्थैर्य, सातारा, दि.०२: कोवीड 19 च्या अनुषंगाने जमावबंदी जारी असतानाही लग्नसोहळ्यात नियमापेक्षा जास्त वर्‍हाडी बोलावल्याप्रकरणी सातारा नगरपालिका आणि शाहूपुरी पोलिसांनी कारवाई करत लग्नमालकास दहा हजार रुपये दंड तर प्रमिला मंगल कार्यालयास 25 हजार असा एकूण 35 हजारांचा दंड केला आहे.

याबाबत माहिती अशी, वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तरीही सातारा येथील प्रमिला मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लग्नसोहळ्यात नियमापेक्षा जादा वर्‍हाडी बोलावल्याचे आढळून आले. या लग्नात सोशल डिस्टंगसिंगचाही फज्जा उडलेला दिसला. त्यामुळे सातारा पालिकेने व शाहूपुरी पोलिसांनी कारवाई करत प्रमिला मंगल कार्यालयाला 25 हजारांचा दंड केला आहे तर वधूपक्षाकडील लग्नमालकास 10 हजारांचा दंड केला आहे.


Back to top button
Don`t copy text!