
दैनिक स्थैर्य । दि. १४ नोव्हेंबर २०२२ । फलटण । गॅस एजन्सीच्या आमिषाने फलटणमधील डॉक्टरची सुमारे अकरा लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 20 सप्टेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान फलटण येथील डॉक्टर रवींद्र सहदेव सोनवणे वय 57 रा. फलटण, ता. फलटण यांना विकास भास्कर व मनीष ग्रोवर यांनी तुम्हाला गॅस एजन्सी काढून देतो, असे आमिष दाखवून सोनवणे यांच्याकडून वेळोवेळी दहा लाख 79 हजार त्यांच्या खात्यावर जमा करून घेऊन सोनवणे यांना बनावट शिक्के व सह्या असलेली इंडेन गॅस एजन्सीची अप्रुव्हल व इन्व्हॉईस बिले पाठवली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर सोनवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.