औंध येथील शिष्टमंडळाने घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट


दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२१ । औंध । भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची औंध येथील ग्रामपंचायत सदस्य वसंत पवार, पोपट कुंभार, युवा नेते गणेश चव्हाण यांनी व ग्रामस्थांनी भेट घेऊन औंधसह परिसरातील विविध अडचणी ,समस्या त्यांच्या समोर मांडल्या.
यावेळी वसंत पवार व गणेश चव्हाण यांनी  औंध परिसरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांची माहिती चंद्रकांत पाटील यांना दिली तसेच औंध परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी केंद्रातील भाजपा सरकारच्या माध्यमातून उदयोगधंदे सुरू करावेत, शेती पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा तसेच वाहतुकीची समस्या तात्काळ सोडविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली.
यावेळी जगदंबा परिवर्तन पँनेलच्या शिष्टमंडळाने चंद्रकांत पाटील यांच्याशी औंधसह खटाव तालुक्यातील विविध समस्या विकासकामांबाबतसविस्तर चर्चा केली . त्याचबरोबर औंधला भेट देण्याचे वसंत पवार व शिष्टमंडळाने दिलेले निमंत्रण ही  त्यांनी स्वीकारले.
दरम्यान याबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्य वसंत पवार म्हणाले की, सामान्य माणसाचा सर्वांगीण विकास डोळयासमोर ठेऊन त्याबाबत येणाऱ्या अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्याचे सांगितले. यावेळी शेखर चरेगावकर, मुकुंद चरेगावकर व औंध ग्रामस्थ ,पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!