नीरा उजवा कालवा विश्रामगृह व कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश लागू


दैनिक स्थैर्य | दि. २० मे २०२४ | फलटण |
नीरा उजव्या कालव्यातून आज सिंचनासाठी पाणी सोडले नाही तर या कालव्यावरील लाभधारक शेतकरी व लोकप्रतिनिधींनी आंदोलन करून मोर्चा काढण्याचा व वीर धरणाचे गेट उघडून पाणी सोडण्याचा इशारा दिल्याने फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फलटण तालुक्यातील कोळकी येथील नीरा उजवा कालवा विश्रामगृह व त्या परिसरातील पाटबंधारे विभागाची कार्यालये, फलटण शहरातील अधिकार गृह परिसरातील कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा, विभाग फलटण कार्यालयाच्या परिसरात कलम १४४ अन्वये जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश सल्लागार समितीची बैठक होईपर्यंत राहणार आहे.


Back to top button
Don`t copy text!