स्थैर्य, फलटण : खरेदी विक्रीच्या पावत्या नसतानाही बैलांना टमटममध्ये क्रुरपणे डांबून कत्तलखान्याकडे निघालेल्या एक जणाविरोधात ग्रामीण पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असुन संभाजी नथू सस्ते सैदापूर ता. कर्हाड असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत महेश पवार वय २८ रा. सुरवडी ता. फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवार दिनांक १४ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सुरवडी गावच्या हद्दित सुरवडी रोडच्या कमानी जवळ एक चार चाकी टमटम गाडी MH – 50-8346 ही थांबलेली दिसली. त्यांना संशय आलेने ते तेथे थांबले, त्यावेळी त्यांचेबरोबर सुरज भोसले हाही आला व त्यांनी सदर गाडीतील हौदयात बघीतले असता तेथे तीन बैल दाटीवाटीने क्रुरतेने डांबून ठेवल्याचे दिसले.
या बाबत सदर गाडीवरील ड्रायव्हरला त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव व गाव संभाजी नथु सस्ते वय 50 वर्षे, रा. अर्बन बझार जवळ, विदयानगर सैदापूर ता. कर्हाड जि. सातारा असे सांगीतले. सदर बैलाबाबत त्यास विचारपूस केली असता सदर बैले कापणेस चालविलेत तुला काय करायचे आहे असे तो म्हणाला. तसेच सदर तीन बैले त्यांनी गाडीत क्रुरतेने डांबून ठेवल्याचे व त्यांच्या पावत्या व जनावरांना चारापाणीची कोणतीही व्यवस्था न केलेली नसल्याचे आढळून आले.
या बाबत त्यांच्याकडे विचारणा करता जनावरांबाबत त्यांच्याकडे कोणतेही खरेदी विक्रीच्या पावत्या आढळून आल्या नाहीत.तसेच जनावरांबाबत कोणतीही चारापाणी व्यवस्था केली नसल्याचे त्याने सांगितले. तसेच त्या जनावरांसाठी कोणतीही वैद्यकिय व्यवस्था केलेली नव्हती. या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी चारचाकी टमटम क्र. MH – 50-8346 व त्यामध्ये असलेले बैल असा सुमारे ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. अधिक तपास सपोनि प्रशांत नागटिळक हे करीत आहेत.