महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ग्रामसेवकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोळेवाडी तालुका फलटण गावच्या हद्दीत गोळेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात राजाराम शंकर ढोक राहणार लक्ष्मी नगर, फलटण, तालुका फलटण या ताथवडा गावच्या ग्रामसेवकाने संबंधित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच संबंधित महिलेस शिवीगाळ, दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी तसेच तुटलेल्या खुर्चीच्या पायाने मारहाण केली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अरगडे अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!