वाहन खरेदी फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । सातारा । ऑडी गाडीचा सात लाख २५ हजार रुपयांना व्यवहार ठरला असताना पैसे न देता चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोहित सर्जेराव पाटील (रा. येलूर, ता. वाळवा) असे त्याचे नाव आहे. याबाबत भावना दिलीप मिळवणे रा. प्रतापगंज पेठ यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिक तपास उपनिरीक्षक मुल्ला हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!