स्थैर्य, सातारा, दि. १७ : ‘तू माझा फोन का घेत नाहीस?’ असे कारमध्ये विचारणा करत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
आशिफ मोईज वलांडीकर (मूळ रा.देवणी, लातूर) व संतोष या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवार पेठ, सातारा येथे घडली आहे. तक्रारदार युवती लातूर जिल्ह्यातील असून सध्या ती साताऱ्यात वास्तव्य करत आहे.