नवविवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य । दि. 01 जानेवारी 2024 । फलटण । नवविवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत सासू व नवरा यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी मौजे साखरवाडी तालुका फलटण गावचे हद्दीत जावई सुशील रामचंद्र घोलप सासू कल्पना रामचंद्र घोलप राहणार साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी माझी मुलगी वृषाली हीस घरातील काम व्यवस्थित येत नाही स्वयंपाक करता येत नाही सकाळी लवकर उठत जा तसेच घर खर्चासाठी माहेरून पैसे घेऊन ये असा सतत मानसिक त्रास देत होते त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून मुलगी वृषाली सुशील घोलप वय 28 वर्षे हिने तिचे राहते घरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केली आहे म्हणून माझी त्यांचेविरुद्ध तक्रार आहे.

अधिक तपास अतुल सबनीस उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण विभाग (अतिरिक्त चार्ज) चे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हुलगे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!