दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । सातारा । पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील विरमाडे गावच्या हद्दीत दोन दुचाकीच्या झालेल्या अपघात प्रकरणी दोन जणांवर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अद्याप कोणास अटक करण्यात आलेली नाही.
भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश इंदलकर याने दिलेल्या फिर्यादीवरुन दि. 10 रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास विरमाडे गावच्या हद्दीत साहिल भरत दुटाळ वय 19, रा. रायगाव हा त्याच्या ताब्यातील दुचाकी क्र. एम.एच.11सी.एक्स 0866 भरधाव वेगात चालवत होता. तर विरुद्ध बाजूने दुचाकी क्र. एम.एच.11 डी.ई.2551 वरुन येणारा राहुल मुगुटराव रोकडे वय 19, रा. मर्ढे याच्याशी समोरासमोर धडक होवून अपघात झाला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांच्याही दुचाकींचे नुकसान झाले. त्यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिज तपास तोरडमल करत आहेत.