विसावा नाका येथे एकास लोखंडी फायटरने मारहाण तिघाजणांवर गुन्हा दाखल


स्थैर्य, सातारा, दि.२४: मित्रासमवेत वाढदिवसाचा केक कापल्याचा राग येवुन एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला लोखंडी फायटरने व लाथाबुक्क्याने मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, हर्षल नितीन कदम वय 17 हा युवक दि. 21 रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास बेकरीतून काही सामान आणण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा मित्र निलेश शिंदे याने त्यास वाढदिवस असल्याचे फोनवर सांगून बोलावून घेतले. त्यामुळे हर्ष येथील कल्याणी शाळा परिसरात आला. त्याठिकाणी त्यांनी वाढदिवसाचा केक कापला. यावेळी आदित्य बनसोडे रा. बाँबे रेस्टॉरंट, सातारा, यश चव्हाण रा. सातारा आणि अथर्व बगे रा. माहुली, सातारा यांनी नीलेश शिंदे सोबत केक का कापला असे विचारून दमदाटी व शिवीगाळ केली. आदित्य बनसोडे याने लोखंडी फायटरने हर्षदच्या डाव्या डोळ्यावर प्रहार केला. यामध्ये हर्षद जखमी झाला आहे. तसेच यश चव्हाण आणि अथर्व बर्गे यांनीही हर्षदला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीवेळी हर्षदची दीड तोळ्याची सोन्याची चेनही गहाळ झाली आहे. याप्रकरणी हर्षदने दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार लक्ष्मण दगडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!