ऊसतोडणी वाहतूक ठेकेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ जून २०२३ | फलटण |
साखरवाडी (ता. फलटण) हद्दीत ऊसतोडणी वाहतूक ठेकेदारांची सुमारे ४३ लाख ७१ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी सहा ऊसतोडणी कामगार-मुकादमांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर महादू पाटील (रा. ढोमणे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), महादू धनराज पाटील (रा. ढोमणे, ता. चाळीसगाव) सुनील श्रवण पवार (रा. नावे, तालुका चाळीसगाव), नारायण रमेश महाले (रा. बहाळ, तालुका चाळीसगाव), प्रवीण अशोक पाटील (रा. वाघडू, ता. चाळीसगाव) व संजय दादाभाऊ गोपळ (रा. नेर्‍ही वडगाव, तालुका चाळीसगाव, जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यांची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, साखरवाडी (ता. फलटण) येथे दि. ०१ जून २०२१ ते २१ जुलै २०२१ दरम्यान फिर्यादी अमर बाबुराव शिंदे (वय ४२, रा. सालपे, ता. फलटण) यांच्याकडून मुकादम महादू धनराज पाटील, ज्ञानेश्वर महादू पाटील (रा. ढोमणे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी ऊसतोड कामगार पुरवितो असे सांगून वेळोवेळी १९,११,०००/- रुपये घेतले. त्याबदल्यात त्यांनी ऊसतोड कामगार पुरविले नाहीत व त्यांना वेळोवेळी पैश्याची मागणी केली असता फोनवरून शिवीगाळ, दमदाटी करून आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच साक्षीदार चुलतभाऊ शशिकांत आप्पासो शिंदे (रा. सालपे) यांच्याकडूनही दिनांक १०/०६/२०२१ रोजी ते दिनांक १३/१२/२०२१ रोजीचे दरम्यान साखरवाडी, सालपे ता. फलटण गावचे हद्दीत मुकादम महादू धनराज पाटील, ज्ञानेश्वर महादू पाटील (रा. ढोमणे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी ऊसतोड कामगार पुरवितो असे सांगून वेळोवेळी ८,२५,००० /- रुपये घेतले. त्याबदल्यात ऊसतोड कामगार पुरविले नाहीत व त्याने वेळोवेळी पश्याची मागणी केली असता फोन वरून शिवीगाळ दमदाटी करून त्याची आर्थीक फसवणूक केली आहे. तसेच फिर्यादी अमर शिंदे व साक्षीदार शशिकांत शिंदे यांची मुकादम सुनिल श्रावण पवार (रा. न्हावे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याने १५,००,०००/- रुपये ऊसतोड कामगार पुरवितो असे म्हणून घेतले होते. त्यापैकी त्यांच्याकडे ७,३५,०००/-रुपये राहिले होते. ते पैसे त्यांना वेळोवेळी मागितले; परंतु त्यांनी दिले नाहीत, उलट शिवीगाळ करुन आमची आर्थीक फसवणूक केली आहे, अशी तक्रार दाखल झाली आहे.

तसेच साक्षीदार अजित बाबुराव शिंदे (रा. सालपे, ता. फलटण) यांच्याकडून साखरवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत दिनांक २३/०८/२०१८ रोजीपासून पुढे मुकादम संजय दादाभाऊ गोपळ (रा. न्हेरी वडगाव, ता. चाळीसगाव, जि.जळगाव) यांनी ७ कोयत्यांसाठी ४,००,०००/-रुपये घेतले. तसेच मुकादम नारायण रमेश महाले (रा. बहाळ, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याने ७ कोयत्यासाठी ४,००,०००/-रुपये घेतले. तसेच मुकादम प्रविण अशोक पाटील (रा. वाघडू, ता. चाळिसगाव, जि.जळगाव) यांनी ५ कोयत्यासाठी १,००,०००/-रुपये घेतले आहेत. या मुकादमांनी ऊसतोड कामगार न पुरविता अजित शिंदे यांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी ज्ञानेश्वर महादू पाटील (रा. ढोमणे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), महादू धनराज पाटील (रा. ढोमणे, ता. चाळीसगाव) सुनील श्रवण पवार (रा. नावे, तालुका चाळीसगाव), नारायण रमेश महाले (रा. बहाळ, तालुका चाळीसगाव), प्रवीण अशोक पाटील (रा. वाघडू, ता. चाळीसगाव) व संजय दादाभाऊ गोपळ (रा. नेर्‍ही वडगाव, तालुका चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!