मारहाण करून खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । सातारा ।  हॉटेल मालकास मारहाण करून खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कराड ता. कराड येथील मंगळवार पेठेतील सुवाद हॉटेल येथे विकास शिवाजी भंडारी रा. बुधवार पेठ, कराड याने येऊन नाश्ता केला. तसेच नाश्ता केल्याचे पैसे देणार नाही. इथून पुढे मला नाश्ता करण्याचे पैसे मागायचे नाहीत, असे म्हणून दारूच्या नशेत शहाजी गोपाळ पल्लीकरा वय 54, रा. मंगळवार पेठ, कराड यांना व त्यांचे पार्टनर सतीश कुबन, हॉटेलमधील कामगार मिराज अब्दुल गफार खान, फिरोज खान, मुगद कुबन यांना शिवीगाळ दमदाटी करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच हॉटेलमधील काऊंटरच्या काचेची तोडफोड करून नुकसान करून मला दर महिन्याला पाच हजार रुपये हप्ता दे, नाहीतर तुझे हॉटेल ठेवणार नाही, असे सांगून खंडणी मागितली आहे. या घटनेची नोंद कराड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक डांगे अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!