
दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । सातारा । दारुसाठी खंडणी मागणाऱ्या चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आम्हाला पैसे नको पण तू आम्हाला दारू दिली पाहिजे अन्यथा तुला आणि तुझ्या बार मालकाला ठार मारू अशी धमकी देण्यात आल्याने पोलिसही चक्रावले आहे.
यानुसार हॉटेल मालकाने तक्रार दिल्यानंतर संबंधित मध्यबिंदूवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे बाबा ओव्हाळ, बंटी गायकवाड ,तन्वीर शेख, व अन्य एक अनोळखी सर्व राहणार प्रतापसिंह नगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी संतोष रामदास मिरगे वय 35 राहणार कोडोली यांचे विसावा नाका येथे आस्वाद परमिट रूम बियर बार आहे या बार मध्ये वरील चौघांनी एकेदिवशी येऊन दारू ढोसली मात्र त्याचे पैसे दिलेला आहे मात्र हे चौघेजण बुधवारी पुन्हा बारमध्ये आले त्यावेळी पहिले बिल दिले नसल्याने मिरगे यांचा आतेभाऊ मदन शिंदे याने त्यांना दारू देण्यास नकार दिला त्यामुळे त्याला धमकी दिली तू आम्हाला दारू दिली नाहीस तर तुला तुझा मालक मिरगे यांना ठार मारेल तसेच तोडफोड करण्याची तंबी दिली व 225 रुपये दारूचे बिल न देता ते निघून गेले मिरगे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला.