दैनिक स्थैर्य | दि. २४ जून २०२३ | फलटण |
गिरवी, ता. फलटण येथील चौघांविरोधात महावितरणच्या वीज चोरी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या चोरीची फिर्याद भरत बाबाजी भोसले यांनी पोलिसात दिली आहे.
मोहन सोपान निकाळजे, गोरख दादासो कदम, गुणवंत साहेबराव निकाळजे व बापुराव हरीबा जाधव (सर्व रा. गिरवी, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या चोरीची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहन सोपान निकाळजे यांनी गेल्या २० महिन्यांपासून घरगुती वीज कनेक्शन नसतानाही घराच्या शेजारील महावितरण कंपनीच्या पोलवरून आकडा टाकून अनाधिकृतपणे घरगुती कारणासाठी विजेचा वापर करत ८ हजार १३० रूपयांचे बिल भरले नाही, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
तसेच गिरवी येथील गोरख दादासो कदम व बापुराव हरीबा जाधव यांनीही महावितरणच्या पोलवरून गेलया १७ महिन्यांपासून आकडा टाकून अनाधिकृतपणे वीज वापरून महावितरणचे प्रत्येकी ७४८०/- रूपयांचे बिल अद्यापपर्यंत भरले नाही, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
गिरवी येथीलच गुणवंत साहेबराव निकाळजे यांनी सहा महिन्यांपासून पोलवरून आकडा टाकून अनाधिकृतपणे वीज वापरून महावितरणचे ५१००/- रूपयांचे बिल अद्यापपर्यंत भरले नसल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
या चोरी प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक काटकर करत आहेत.