दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
जनावरांच्या लम्पी संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानाही सुरवडी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत दि. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी अटी व शर्तींचा भंग करून बैलगाडा शर्यत भरविल्याप्रकरणी व बैलांची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना निर्दयीपणे शर्यतीत पळविल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सुमारे १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र तायाप्पा चौगुले, संभाजी बिराप्पा केंगार, तुषार सोमनाथ करे, सोनू दगडे, सुरेश बाळासाहेब जाधव, वैभव खंडेराव जाधव, स्वप्निल संजय जगदाळे, अजित मल्हारी जाधव, कोंडीराम बापू जावळे, सुहास रोहिदास जाधव, गणेश दत्तात्रय मदने, मंगेश बन्याबा जाधव, अविनाश दत्तात्रय जाधव, सागर काशिनाथ मदन व दादा मदने अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक गोडसे यांनी भेट दिली असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार व्ही. आर. सूर्यवंशी करत आहेत.