खुंटे येथील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक


दैनिक स्थैर्य | दि. ३० सप्टेंबर २०२३ | फलटण |
खुंटे (ता. फलटण) येथील रिटे वस्तीवर जनावरांच्या गोठ्यात व बारामती येथे युवतीवर अत्याचार केल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकास अटक केली आहे.

गौरव उर्फ सचिन नितीन खलाटे (रा. खुंटे, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सुमारे पाच महिन्यांपूर्वी खुंटे, ता. फलटण येथील रिटे वस्तीवर फिर्यादीच्या मालकीच्या जनावरांच्या गोठ्यावर सायंकाळी १६.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी एकटीच असताना शेजारील भावकीतील गौरव ऊर्फ सचिन नितीन खलाटे हा सुझुकी कंपनीची टि.व्ही.एस. स्टार मोटर सायकल घेऊन तेथे आला व माझ्या अंगाला मिठी मारली. माझ्याशी तो वेगवेगळे अश्लील चाळे करून त्याने माझ्यावर बलात्कार केला. तसेच मी बारामती येथे शिक्षण घेत असताना या ठिकाणी त्यांच्याकडे असणारी पांढर्‍या रंगाची ओमनी गाडी वरचेवर घेऊन येऊन मला ब्लॅकमेल करून त्याच्या ओमनी गाडीतून निर्जनस्थळी नेवून दोन ते तीनवेळा बलात्कार केला आहे. तसेच हा प्रकार घरातील लोकांना सांगितला तर तुझ्या वडिलांना जिवे मारून टाकीन, अशी दमदाटी केली. सुमारे एक महिण्यापूर्वी मी त्याचा मोबाईल ब्लॉक केला म्हणून त्याने माझ्याकडे बारामती येथे कॉलेजवर येऊन माझा मोबाईल हिसकावून घेऊन तो जमिनीवर आपटून त्याचे नुकसान केले आहे, अशी तक्रार पीडितेने पोलिसात दिली आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी भेट दिली असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!