दैनिक स्थैर्य | दि. २४ मे २०२३ | फलटण |
फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील अदित्य कॅफेचा चालकाने कॅफेचा परवाना नसतानाही कॅफे चालवून तसेच जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याने त्याच्या विरोधात फलटण शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, दि. २३ मे २०२३ रोजी दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास फलटण लक्ष्मीनगर येथे आदित्य कॉफी कॅफे याचे जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शहर पोलीस चेकिंग करत असताना कॅफेचे मालक अदित्य दत्तू मदने याच्याकडे कॅफेबाबतचा परवाना नाही. तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कॅफे शॉपमध्ये बैठक व्यवस्था सिसिटीव्ही कॅमेराच्या कक्षेस येईल, अशी नसून दरवाजे पारदर्शक नाहीत व बैठक व्यवस्था स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना नाही, त्यामुऴे सदर कॅफेमालकाने जिल्हाधिकारी यांचे आदेश पारीत झाल्यानंतर कोणत्याही आदेशाचे पालन केले नाही म्हणून त्याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पो. हवा. सोनवलकर करत आहेत.