स्थैर्य, सातारा, दि. 19 : विवाहितेचा जाचहाट करून तसेच पोटगी न देता घरातून हाकलून देवून दुसरे लग्न केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, नणंद यांच्यासह सातजणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, आफरीन समीर मुलाणी वय 25 रा. शनिवार पेठ, सातारा यांचे सासर वडूज येथे आहे. जून 2015 पासून त्यांचा सासरच्या मंडळीकडून जाचहाट सुरू आहे. पती समीर करीम मुलाणी वय 27 रा. वडुज हा मानसिक व शारीरिक छळ होत होता. तसेच पतीसह सासू शहनाज मुलाणी, सासरे करीम रसूल मुलाणी, नणंद परवीन करीम मुलाणी हे चौघे सातत्याने माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावून आफरीन यांना मानसिक त्रास देत होते. तसेच त्यांच्या माहेरच्या लोकांना शिवीगाळ करत होते. 2016 मध्ये आफरीन प्रसुतीसाठी आल्या असता त्यांची विचारपूस केली नाही.
दरम्यान, सौ. आफरीन यांनी या जाचहाट सातारा येथील न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी पती समीर यांनी 4 हजार पोटगी देण्याचे ठरले होते. मात्र, त्यांनी पोटगी दिली नाही. दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी आफरीन पुन्हा सासरी गेल्या असता त्यांना त्यांच्या बाळासह घराबाहेर काढले. यावेळी चुलत सासरे कासम रसूल मुलाणी, पतीच्या आत्याची मुलगी शहनाज शेख व मोसीन शेख रा. पुसेगाव, ता. खटाव यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पती समीरने पत्नी आफरीन यांच्याशी फारकत न घेताच दुसरे लग्न केले आहे. याप्रकरणी आफरीन यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पती, सासू-सासरे, नणंद, चुलत सासरे यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार सणस करत आहेत.