
दैनिक स्थैर्य । दि. ०५ जानेवारी २०२३ । सातारा । खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब तालुका सातारा येथे आदित्य संजय सोनमळे याला शाळेतील गैरवर्तुणकीमुळे शाळा व्यवस्थापन समितीने समाज दिल्याचा राग मनात धरून त्याचा चुलत भाऊ ओंकार आनंदराव सोनमळे, साहिल संतोष सावळकर आणि अनोळखी एकजण सर्व राहणार लिंब, तालुका सातारा यांनी लिंब चतुरबेट गावच्या हद्दीत जितेंद्र सर्जेराव सावंत यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दि. 1 जानेवारी रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास धारदार हत्यार आणि व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. यानंतर हल्लेखोर मोटरसायकल वरून पळून गेले. याबाबतची फिर्याद बिपिन सर्जेराव सावंत राहणार चतुर बेट लिंब, तालुका सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक घोडके करीत आहेत.