
दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सुऱ्याने वार केल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 नोव्हेंबर रोजी अभिजीत नंदकुमार कदम राहणार मालगाव तालुका सातारा यांची मैत्रीण जिल्हा रुग्णालयात ऍडमिट असल्याने तिचे कपडे आणण्यासाठी कदम हे तिच्या गावी गेले असता मैत्रिणीचे पती नितीन भेंडे राहणार वर्ये, तालुका सातारा यांनी कदम यांच्या चेहऱ्यावर सुऱ्याने वार केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार बागवान करीत आहेत.