घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । घातक शस्त्र जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 25 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वाघोशी, तालुका फलटण गावच्या हद्दीत ताथवडा ते बीबी रोडवर गरीब्या उर्फ बाळू शिवा उर्फ शिवाजी काळे वय 25 राहणार वडगाव तालुका फलटण हा तलवार घेऊन उभा असलेला सापडला. याबाबत अमोल रामदास जगदाळे वय 36 यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!