
दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा – ठोसेघर मार्गावर निरंकारी मठाजवळ चार चाकी वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराला जखमी केल्याप्रकरणी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१३ ऑक्टोंबर रोजी सातारा – ठोसेघर मार्गावर निरंकारी मठाजवळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कारचालक अभिषेक अनिल दरेकर, रा. भिवडी, ता. जावली याने आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. बारा एचएफ ४७२० अविचाराने चालवून, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी क्रमांक एम. एच. ५० एस ५४२१ ला जोरदार धडक देऊन दुचाकीस्वार संतोष झोरे रा. रामेल, वनकुसावडे, ता. सातारा ला जखमी केल्याप्रकरणी आनंदात दगडू झोरे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चार चाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.