
दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२४ | फलटण | फलटणचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकीमध्ये “एस. के. कार डेकोरेटर्स” च्या नूतन दालनाचे उद्घाटन साधेपणाने संपन्न झाले. गत ५ वर्षांपासून “एस. के. कार डेकोरेटर्स” फलटणकरांच्या सेवेमध्ये कामकाज करीत आहे. चारचाकी गाडीच्या विविध खात्रीशीर कामांसाठी “एस. के. कार डेकोरेटर्स” नावाजलेला ब्रँड आहे. त्यांच्या या नवीन दालनामुळे फलटणमध्ये तातडीचे खात्रीशीर कामे आता होणार आहेत.
“एस. के. कार डेकोरेटर्स” मध्ये चारचाकी गाडीचे सीट कव्हर्स, फ्लूअर लॅमिनेशन, अँड्रॉइड स्क्रीन, कॅमेरा, विविध प्रकारचे स्पिकर्स, व्हुफर्स, साऊंड सिस्टीम, व्हायला कॅप्स, अलॉय व्हील्स, सेंटर लॉक, फॉग लॅम्प्स, हेडलाईट्स, स्टिअरिंग कव्हर्स यासह कार डेकोरेशनचे विविध सामुग्री उपलब्ध आहे. यामुळे आता फलटण मधील नागरिकांना पुण्या-मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही.