फलटणच्या शंकर मार्केटमधून ३० हजारांच्या रकमेची पिशवी चोरट्याने लांबविली


दैनिक स्थैर्य | दि. १६ जुलै २०२४ | फलटण |
फलटणमधील शंकर मार्केटमध्ये असलेल्या बाजारी गुरुजी शाळेसमोरून दि. १५ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास गाडीला अडकवलेली पांढर्‍या रंगाची पिशवी व त्यातील ३० हजार रुपयांची रोख रक्कम व युनियन बँक, कॅनडा बँक व सेंट्रल बँक व एसबीआयचे पासबुक व चेकबुक, एक्सेल गाडीचे कागदपत्रे अज्ञात चोरट्याने लांबविल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात सीताराम गिरजाप्पा चांगण (रा. सासकल, ता. फलटण) यांनी दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो. हवा. फाळके करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!