तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशांत अहिवळे यांचा सत्कार


दैनिक स्थैर्य | दि. १६ जुलै २०२४ | फलटण |
राजे गटाचे कट्टर समर्थक प्रशांत शांताराम अहिवळे यांची सातारा जिल्हा सेवक पतसंस्थेच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल अहिवळे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट फलटण शहर व तालुक्याच्या वतीने सोमवार, दि. १५ जुलै २०२४ रोजी पक्ष कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र संघटक मधुकर काकडे यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी रिपाइंचे विजय येवले, जिल्हा सचिव राजू मारुडा, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना शेख, जिल्हा सेक्रेटरी संजय निकाळजे, जिल्हा कार्यकारणी सदस्य सतीश अहिवळे, अध्यक्ष फलटण तालुका तेजस काकडे, उपाध्यक्ष फलटण शहर संतोष अहिवळे, नवनाथ भोईटे, बापू नामदास, आबा कांबळे, सुखदेव काकडे, मधुकर मोरे, दादा कांबळे, गणेश भोईटे, रणजीत बंगाली, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!