दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | तालुक्यातील सासकल तालुका फलटण येथील ९५ वर्षांचे रामचंद्र गार्डे यांनी निवडणूक आयोगाने केलेल्या सुविधेचा स्वीकार न करता स्वतःहून व्हीलचेअर वर येऊन मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. एका बाजूला निवडणूक आयोगाने 85 वर्षाच्या वरील व्यक्तींचे मतदान हे प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु रामचंद्र गार्डे यांनी ती सुविधा नाकारून प्रत्यक्ष सासकल येथील मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
याबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले “मतदान हा आपला संविधानाने दिलेला अधिकार आहे. तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. लोकशाही व्यवस्था मजबूत राहण्यासाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मी माझी सून व नात यांच्यासोबत येऊन आज मतदानाचा हक्क बजावला. मी घरी ही मतदान करू शकलो असतो. परंतु हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये स्वतः सहभागी होता यावं म्हणून मी मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्याचा निर्णय घेतला.”
भारतीय संविधानाने निवडणूक आयोग ती स्वतंत्र यंत्रणा ठेवले आहे. त्यामुळे अनेक पक्ष व नेते जनतेला पैशाचे आम्हीच दाखवून व दारू, मटन अशा जेवणावळी करून लोकशाही उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.