८व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ; किमान वेतन ७२ हजारांवर पोहोचणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ प्रस्तावित असून fitment factor ४ पट करण्याची मागणी मांडण्यात आल्याने पगारात बंपर वाढ होणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ३० सप्टेंबर : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार लवकरच ८व्या वेतन आयोगाची रचना करण्याची शक्यता असून, नव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात (Basic Pay) मोठी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८ हजार रुपयांवरून थेट ७२ हजार रुपये प्रतिमहिना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढीची मागणी

८व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) २.५७ वरून थेट ४ पट करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून लावून धरली जात आहे. फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल, तितकी मूळ वेतनात आणि निवृत्तीवेतनात मोठी वाढ होते. जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पगारात प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळेल.

महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांमध्येही सुधारणा

७वा वेतन आयोग संपत आल्याने आणि महागाई ५० टक्क्यांच्या पुढे गेल्याने नवीन वेतन आयोगाची स्थापना करणे आवश्यक बनले आहे. या नव्या रचनेमुळे केवळ मूळ वेतनच वाढणार नाही, तर घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता आणि महागाई भत्त्याच्या रचनेतही सुधारणा होणार आहे. केंद्र सरकारच्या या संभाव्य निर्णयामुळे देशातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!