उपअभियंता अजय देशपांडे शासनाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित; फलटण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव

सार्वजनिक बांधकाम विभाग फलटण उपविभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांना उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मुंबईत प्रदान करण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. २९ सप्टेंबर : सार्वजनिक बांधकाम विभाग फलटण उपविभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांना सन २०२५-२६ या वर्षासाठीचा उल्लेखनीय कामगिरीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते हा सन्मान सोपवण्यात आला असून देशपांडे यांच्या कामकाजाचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.

महाबळेश्वरमधील उल्लेखनीय कार्याचा गौरव

अजय देशपांडे यांनी यापूर्वी महाबळेश्वर येथे प्रभावी कामकाज केले आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या महाबळेश्वर येथील बहुचर्चित ‘केबल स्टे ब्रिज’च्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. प्रशासकीय आणि तांत्रिक कौशल्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या विशेष पुरस्काराने गौरवले आहे. नुकताच राज्य शासनाने याबाबतचा अधिकृत निर्णय प्रसिद्ध केला होता.

मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

शासकीय पातळीवर मिळालेल्या या महत्त्वपूर्ण गौरवाबद्दल फलटण तालुक्यातून मोठे कौतुक होत आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिजामाला नाईक निंबाळकर आणि अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी देशपांडे यांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!