एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय; १ ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्डशिवाय सवलत मिळणार नाही

एसटी महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीत मोफत प्रवास करण्यासाठी १ ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक केले आहे. प्रवाशांनी लवकर कार्ड काढावे.

स्थैर्य, फलटण, दि. २९ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीमध्ये प्रवास करण्यासाठी १ ऑक्टोबरपासून एनसीएमसी (NCMC) कार्ड बंधनकारक केले आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात हे कार्ड काढणाऱ्यांची संख्या सर्वात कमी असल्याने, प्रवाशांनी लवकरात लवकर कार्ड काढून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विनाकार्ड सवलत नाही

राज्यभरात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. मात्र, यापुढे सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरपासून ज्या प्रवाशांकडे हे कार्ड नसेल, त्यांना सवलतीमध्ये प्रवास करता येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

फलटणमध्ये १९ ठिकाणी कार्डची सुविधा

फलटण तालुक्यात सवलतधारकांनी हे कार्ड काढण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी फलटण बस स्थानकामध्ये कार्ड काढण्याची सोय करण्यात आली आहे. यासोबतच एसटी महामंडळाने फलटण तालुक्यातील एकूण १८ जणांना एनसीएमसी कार्ड काढण्याची अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन तातडीने आपले कार्ड काढून घ्यावे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!